आरटीआय न्युज स्पेशल

प्रभागाचा विकास निधी गेला कुठे?

मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

पत्रपरिषदेत व्दारकानगरी व वानखेडेवाडी पुरग्रस्तांचा जिला प्रशासन व पालकमंत्र्यांना प्रश्न  

समस्या न सुटल्या 1 ऑगस्ट ला आमरण उपोषण व जनआंदोलनाचा इशारा 

चंद्रपूर. मागील सप्ताहांपासून संततधार पाऊसामुळे शहरातील दे.गो. तुकूम परीसरातील व्दारकानगरी व वानखेडवाडी मधील शेकडों नागरीकांच्या घरामध्ये पाणी शिरून वित्त हानी होत आहे. यासंदर्भात एक वर्षापासून लोकप्रतिनिधि, जिला प्रशासन व नगर प्रशासन यांचेकडे पत्रव्यवहार करून सुध्दा आजपावेतो उपाययोजना करण्यात आली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पुरग्रस्त कामाच्या उपाययोजनेसाठी आवश्यक निधी मंजूर केला परंतु तो निधी दूस_याच अतिमहत्वाच्या कामासाठी वळता केला. पुरग्रस्त क्षेत्राच्या विकासासाठी आलेला निधी गेला कुठे? असा प्रश्न द्वारकानगर व वानखेडेवाडी निवासीयांनी पत्रपरीषदेच्या माध्यमातुन पालकमंत्री, जिला प्रशासन व नगर प्रशासनाला केला आहे. तत्काळ पुरग्रस्त क्षेत्राची समस्या न सोडविल्यास 1 ऑगस्ट ला महानगरपालिका समोर आमरण उपोषण व आमदार, पालकमंत्री यांचे घरी परीवारसोबत समस्या निवारण साठी चर्चा करण्याची माहीती पत्रपरीषदेत वामन बुटले यांनी दली.

दे.गो. तुकूम द्वारका नगरी, वानखेडेवाडी येथे 25 जुलै 2013 ला प्रचंड प्रमाणमध्ये शेकडो नागरीकांच्या घरात पाणी शिरून वित्त हानी झालेली होती. मागील वर्षी सुध्दा पाणी शिरून वित्त हानी व प्रचंड नुकसान सहन करावा लागला. पुराच्या पाण्यापासुन स्थायी उपाययोजना करण्यासाठी मागील वर्षीपासून जिला प्रशासन, नगर प्रशासन व पालकमंत्री यांचे पत्रव्यवहार करण्यात येत आहे. परंत आजपावेतो कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही.

यांसदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे चर्चा केल्यानंतर कामाच्या उपाययोजनेसाठी 2 कोटी 16 लाख रूपयांचा निधी आनलाईन बैठकीत मंजूर करून निधी जिलाधिका_यांकडे सुपूर्द करण्यात आला. परंतु तो निधी दुस_याच अतिमहत्वाच्या कामासाठी वळविण्यात आली. पुरग्रस्तांच्या समस्यां पेक्षा अन्य अतिमहत्वाचे कुठले काम असु शकते, पुरग्रस्तासारख्या गंभीर समस्येकडे लक्ष ने देता हे काम प्रलम्बित ठेवल्याने येथील जनतेच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

या परीसरात एक कान्वेंट शाळा आहे. पुरामुळे शाळेतील मुलांचे जीव ध्योक्यात येऊ शकते. पाऊस आली की परीसराती नागरीक रात्र दिवस जागुन काढत आहे. त्यामुळे प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात आजपर्यत उपाययोजना बाबत ठोस निर्णय कार्रवाई न झाल्यामुळे येथील नागरीकांच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

सात दिवसांचे आत पुरग्रस्त क्षेत्रा संदर्भात उपाययोजना न केल्यास 1 ऑगस्ट 2024 ला महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण व आमदार, पालकमंत्री यांचे घरी परीवारसह जाऊन प्रश्न सोडविण्यावर चर्चा करण्यात येईल. आंदोलन दरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार झाल्यास सर्वस्वी जवाबदार शासन व प्रशासन राहील अशी माहीती वामन बुटले यांनी दीली.

पत्रपरीषदेला द्वारकानगरी, वानखेडेवाडी आपातकालीन संघर्ष समिति चे वामन बुटले, प्रशांत भारती, राजेश वांढरे, दिलीप जमदाडे, विनोद ढाले, जयंत गाडगे, सुधाकर थेरे, सुधाकर रोडे, विवेक निखार, विवेक लोनबले, राज मीश्रा, शिला आमडे, गिता जमदाडे, साधना गिरी, किरण कुंडले आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker