गुन्हेगारीताजे अपडेट
Trending
सांगोला तालुक्यातील कोळा येथे दोघांचा खून
दोन खुनाच्या घटनेमुळे सांगोला तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर




सांगोला : कोळा (ता. सांगोला) येथे दोन गटात चाकू धारदार शस्त्र, काठी, लाकडी फळीने केलेल्या जबर मारहाणीत दोघांचा खून झाला, तर दोन्ही गटातील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दोन खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून, तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चवट्यावर आलेला आहे.अज्ञात कारणावरून सहाजणांनी संगणमत करून चाकूने पोटात भोसकून एकाचा खून केला तर एकास पोटात भोसकून गंभीर जखमी केले तर दुस-या घटनेत दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून सहाजणांनी लाकडी फळीने व हाताने लाथाबुक्क्यांनी केलेल्या हाणामारीत एकाचा खून केला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री कोळे (ता. सांगोला) येथे घडली. बाळू शामराव आलदर (रा. संत तुकाराम नगर, आलदर वस्ती कोळे ता. सांगोला) व सुरज उर्फ बंड्या रमेश मोरे (वय ३१, रा. आंबेडकर नगर, कोळे ता. सांगोला) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत, कुंडलिक महादेव आलदर व विकास महादेव मोरे यांनी पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दिली असून, पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेत दोघांना अटक केली असून चौघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.