ताजे अपडेट
Trending

सोलापूर जिल्ह्यास हवामान शास्र खात्याकडून रेड अलर्ट जारी

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून काळजी घेण्याचे आवाहन

 

सोलापूर : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेमार्फत सचेत ॲप्लीकेशनवर राष्ट्रीय हवामान शास्र खात्याद्वारे दिनांक १० एप्रिल रोजी दुपारी १.०० वा.पासून दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत वीजांच्या कडकडांसह जोराचा वारा, हलका मध्यम पाऊस तसेच ३०-४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान ख्यात्‍याने वर्तवली असल्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तरी, खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

           विजेच्या कडकडांसह पावसाची पूर्वसूचना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या, घराच्या बालकनी छत अथवा घराबाहेर ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तु त्वरित बंद करा. तारांचे कृपण विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दूर राहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यापासून बाहेर पडा. तसेच “दामिणी”, “सचेत”ॲप वापरावे आणि वापराबाबत जनजागृती करावी.

 आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका, शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईप लाईन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या कडकडासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूचा सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुंभार यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker