ताजे अपडेटराजकारण
Trending

सोलापुरात धर्मराज काडादी यांचा प्रणिती शिंदे यांना जाहिर पाठिंबा;भाजपाला चारी मुंड्या चीत करा:धर्मराज काडादी

प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी जोमाने प्रयत्न करा असे आवाहन श्री सिद्धेश्वर परिवाराचे नेते व सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी केले.

सोलापुरातील श्री सिद्धेश्वर परिवारातील लिंगायत समाजाच्या प्रमुखांची बैठक श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. काडादी पुढे म्हणाले, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर लगेचच प्रणिती शिंदे यांनी कारखाना स्थळावर येऊन पाहणी केली आणि सर्व कामगारांना धीर दिला. प्रणिती शिंदे यांच्या अंगात काम करण्याची धमक आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ अशा पाच तालुक्यांमध्ये सिद्धेश्वर संख्येने आहेत. मी स्वत:कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने आहेत. मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून सभासदांची एक बैठक कारखान्याच्या मंगल कार्यालयात आयोजित करणार आहे. त्या बैठकीत मी सभासदांना आवाहन करणार आहे की, ज्यांनी मला त्रास दिला. कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त केले अशा भारतीय जनता पार्टीला चारी मुंड्या चीत करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. प्रणिती शिंदे यांनी चिमणीचा मुद्दा वेळोवेळी सभागृहात मांडून धारेवर धरले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही यात्रेच्या वेळी रस्त्याबद्दल स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन रस्त्याचा विषय मार्गी लावला होता.                                                          सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी सुद्धा वीरशैव कक्कय्या समाजाचा आहे. काडादी यांनी धाडस करून उघड उघड मीटिंग घेऊन पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. प्रणितीताई जिद्दी आहेत. त्या धडाडीने काम करतात. काम करताना जात-पात बघत नाहीत. त्यांना साथ द्यावी असे आवाहन ही शिंदे यांनी केले.

धर्मराज काडादी व सिद्धेश्वर परिवाराच्या पाठिंब्यामुळे प्रणिती शिंदे यांना मोठे बळ मिळाले असून यामुळे प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. प्रणिती शिंदे यांच्या मताधिक्यात या निर्णयामुळे मोठी वाढ होणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, बाजार समितीचे संचालक अमर पाटील, केदार उंबरजे, अशोक पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शिवयोगी शास्त्री हिरेमठ, सिध्दाराम चाकोते, शंकर पाटील, रामदास फताटे, अनिल सिंदगी, हरिष पाटील, विजयकुमार हत्तूरे, रमेश बावी, सकलेश बाभूळगावकर यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना, सिद्धेश्वर देवस्थान, सिद्धेश्वर शिक्षण संस्था, सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकारी सह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी सुरेश हसापुरे यांनी प्रास्ताविक केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker