ताजे अपडेट

जवळा परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर, लाखो रुपयांची हानी

आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी 

 

सांगोला :  जवळा ता सांगोला येथील गावडेवाडी, बर्वेवस्ती, शेखवस्ती आणि करणवरवस्ती येथे गुरुवार दि १८ रोजी रात्री वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेक घरांची पडझड झाली, काही ठिकाणी महावितरणच्या विजेच्या तारा तुटल्या तर संस्कृती अंकुश करणवर आणि सत्यवान गावडे या दोघे जखमी झाले आहेत. नुकसानग्रस्त परिवाराची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी घटना स्थळाची पाहणी केली तसेच तहसीलदार संतोष कणसे यांना याबाबत माहिती देत नागरिकांना तातडीची शासकीय मदत जाहीर करण्याच्या सूचना दिल्या.

गुरुवार दि १८ रोजी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे जवळा गावडेवाडी, बर्वेवस्ती, शेखवस्ती आणि करणवरवस्ती या परिसरातील काका संदीपान गावडे, अशोक गावडे, सत्यवान गावडे, कुमार आगलावे, भगवान करणवर, लाला मेटकरी, अजय शेख, बिरा बर्वे आदींच्या घरांची पडझड झाली. घरावरील पत्रे आणि कौले उडून गेल्याने परिसरातील अनेकांचे संसार उघड्यावर आले तर डोक्यात कौले पडून संस्कृती अंकुश गावडे ही चिमुकली जखमी झाली तर अंगावर पत्रे पडल्याने सत्यवान शिवाजी गावडे हेही जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ नुकसान ग्रस्त परिवारास भेट दिली आणि तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी ज्येष्ठ नेते अरुणभाऊ घुले, बाबासो इमडे, बिरा बर्वे, अक्षय बर्वे, बजरंग बर्वे आदीसह जवळा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

वादळी वाऱ्यामुळे जवळा आणि परिसरात घरावरील छत उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोघे जन जखमी झाले आहेत. उघड्यावर पडलेले संसार पुन्हा उभा करण्यासाठी या परीवरांना मी भेट दिली आणि सबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना केल्या.                     -मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker