ताजे अपडेट
प्रादेशिक परिवहनचे 01 मे ते 08 मे पर्यंत शिबीर(कॅम्प) कार्यालय राहणार बंद

सोलापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तालुक्यांमध्ये नागरीकांच्या सोयीसाठी शिबीर कार्यालय भरविण्यात येते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कामकाजामुळे शासकीय विश्रामगृह शिबीर कार्यालयासाठी उपलब्ध होत नसल्याने दि. 01 मे ते 08 मे 2024 रोजी पर्यंत शिबीर कार्यालय भरविले जाणार नाही. दि.09 मे 2024 पासून शिबीर कार्यालय नियमीत चालू राहतील. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.