
कासेगाव, ता. पंढरपूर येथे कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी आरोपी माऊली उर्फ हरिदास वाघमारे रा. कासेगाव, ता. पंढरपूर यास मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणाची हाकिकत अशी की, कासेगाव, ता. पंढरपूर येथे आरोपी वाघमारे कुटुंबियांचा पाळीव कुत्रा घटने दिवशी फिर्यादीवर भुंकलेच्या कारणावरून झालेल्या भांडणात फिर्यादीवर सत्तुर ने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आरोपी माऊली उर्फ हरिदास वाघमारे यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे भा. द. वि. कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. आरोपीने पंढरपूर सत्र न्यायालयात केलेल्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्या निकाला विरुद्ध आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होऊन उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. फिर्यादीचा खून करण्याचा कोणताही उद्देश नव्हता असे घटनेवरून दिसून येते असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीनाच्या सुनावणी दरम्यान केला. न्यामुर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी हरिदास @ माऊली वाघमारे याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला .
याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. राजश्री न्यूटन यांनी काम पाहिले.