आपला जिल्हा

आयपीएल सट्टा संदर्भात अटकेत असलेल्यांच्या संपत्तीची चौकशी करा-स्त्री शक्ती बहुउदेशशीय संस्थेची मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

चंद्रपूर:-आयपीएल सट्टाबाजारी करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.या अटकेतील आरोपींसह त्यांना सहकार्य करणाऱ्या बुकींच्या संपत्तीची आयकर विभागामार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी स्त्री शक्ती बहुउदेशशिय संस्थेच्या अध्यक्षा सायली येरणे यांनी केली आहे. पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना संदर्भात निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आयपीएल सुरू झाल्यापासून चंद्रपूर शहरात कोट्यवधी चा सट्टा खुलेआम चालतो आहे. 2016 पासून शहरात आयपीएल सट्टा सुरू आहे. यासंदर्भात सामाजिक समता संघर्ष समिती चंद्रपूर च्या तक्रारीनंतर काही सट्टाकिंग वर पोलिसांनी कारवाई केली.त्यांना अटक सुद्धा झाली. मात्र अजूनही यातील सूत्रधार अटकेच्या बाहेर असून ते शहरात अवैधरित्या आपला कारभार करीत आहेत.त्यांनाही त्वरित अटक करून हा गोरखधंदा बंद करावा.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,
हा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू असून या व्यवसायातून अटकेत असलेले व ज्यांची नावे विविध माध्यमातून सूत्रधार म्हणून येत आहेत त्यांनी व सट्टाकिंग यांनी करोडोची संपत्ती गोळा केली आहे. याच संपत्तीतुन त्यांनी विदेश वारी सुध्दा केली.
हा सर्व पैसा अवैधरित्या कमविण्यात आला असून कोणत्याही प्रकारचा शासनाचा कर भरलेला नाही. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची आयकर विभागाच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात यावी व संपत्ती शासनाकडे जमा करावी, अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक यांचे वतीने सदर निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदानवार यांना सादर करण्यात आले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष ऍड. वीणा बोरकर, सचिव संतोषी चौहान, अलका मेश्राम, पूजा शेरकी, रूपा परसराम,प्रेमीला बावणे, शम्मा जावेद काजी, माधुरी निवलकर, प्रतिभा लोनगाडगे व माला पेंदाम आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker