वरोरा तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी, बोर्डा जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका, शा.व्य.स. अध्यक्ष व सरपंच यांना निलंबित करा.
मुख्य संपादक - हिमायुँ अली,मोबाइल नंबर -8975250567

आप चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांची मागणी.
दिनांक 15 जुलै 2024 रोजी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी गट विकास अधिकारी वरोरा यांची भेट घेतली. बोर्डा येथील जिल्हा परिषद शाळा गेल्या 7 वर्षा पासुन गैररित्या किरायाने दिल्या बद्दल चा गंभीर विषय काही दिवसा अगोदर आम आदमी पार्टी च्या माध्यमातून उघडकीस आणला होता.
पण या विषयावर आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाहीत व कोणत्याही पद्धतीची कोणत्याही व्यक्ती वर कार्यवाही करण्यात आली नाही. गेल्या 7 वर्षा पासुन बेकायदेशीररित्या जिल्हा परिषद शाळा ही एका डेकोरेशन वाल्याला किरायाने देण्यात आली. याबाबत गटशिक्षण अधिकारी यांना माहीत असून सुद्धा त्यांनी यावर कारवाही केली नाही. बोर्डा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व बोर्डा गावातील सरपंच यांनी मिळून गैरप्रकारे ठराव घेऊन संगनमत करून त्या डेकोरेशन वाल्याला 7 वर्षासाठी शाळा किरयाणे देण्यात आली व त्या शाळेत गैर प्रकारे एक दहावी मधे शिकणारा 15 वर्षाचा मुलगा तिथे मुलाना शिकवत होता.
त्या मुलाकडून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली तर याचे जबाबदार कोण असणार असा प्रश्र्न गट.वी.अधिकारी समोर विचारण्यात आले व त्यांना सांगितले की, इथे कुठेतरी शाळा शिकणारा मुलांच्या भविष्य सोबत खेळण्याचे काम सुरू झालेलं आहे. यावर तत्काळ लक्ष केंद्रित करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गटविकास अधिकारी यांना निवेदना द्वारे करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा सहसचिव सोनल पाटील, वरोरा तालुका उपाध्यक्ष अमोल पिंपळशेंडे, बंटी खडके व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.