पडोली-घुग्घुस रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा. – खासदार प्रतिभा धानोरकर
मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

पडोली-घुग्घुस रस्त्याची अवस्था खराब झाली असून सदर रस्त्यावर अपघाताच्या किरकोळ घटना घडत आहेत. त्यामुळे सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कार्यकारी अभियंता पांढरकवडा यांना पत्राद्वारे केली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून पडोली घुग्घुस रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या किरकोळ घटना घडत आहेत. सदर रस्त्यावर शाळा देखील असून एमआयडीसी कडे जाणारे अनेक कर्मचारी याच रस्त्याचा वापर करीत असतात. परंतु सदर रस्ता सध्या अतिशय खराब झाला असून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा उग्र आंदोलन करणार असल्याचे पत्र खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कार्यकारी अभियंता पांढरकवडा यांना दिले आहे.
या रस्त्यावर जड वाहतूकीमुळे देखील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याबाबत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रातून लोकभावना कळविली असून याबाबत कार्यकारी अभियंता यांना त्वरीत काम करण्याच्या भ्रमणध्वनी द्वारे सुचना देण्यात आल्या.