गुन्हेगारी

चाकुचा धाक दाखवुन पैसे, मोबाईल लुटमार करणारा आरोपी अवघ्या काही तासात अटक

मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

सदर गुन्हयातील फिर्यादी सुभाष प्रविण मराठे, वय २५ वर्षे, शिक्षण १२ वी, धंदा- खाजगी नोकरी, टाटा मोटर्स, ताडाळी, रा.साखरवाई, ता. जि. चंद्रपुर हे त्याची बहिण जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे भरती असल्याने तिला पाहण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दि. ०९/०८/२०२४ रोजी रात्री २१.०० वा सुमारास भेटण्याकरीता आले होते. रूग्णालय परीसरात संचारात लघवी करण्यासाठी गेले असता तेथे अचानक दोन अनोळखी मुले तोंडाला काळे दुपटटे बांधलेले त्यांचेजवळ आली.

त्याचेपैकी एकाने चाकु दाखवुन ‘साले पैसे निकाल वरना पेट में चाकू मार दूंगा’ असे महटले, त्यावर फिर्यादीने त्याला पैसे नसल्याने सांगितले. दुसऱ्या मुलाने फिर्यादी यांना मागुन पकडुन ठेवले. दुसऱ्या मुलाने त्यांचे पाठीवर व बरगडीवर हाताने बुक्क्या मारून जबरदस्तीने त्यांचे पॅण्टचे खिशातील रोख रूपये ११,०००/-रु. बँक ऑफ इंडियाचे बँक पासबुक, एक realme कंपनीचा वापरता मोबाईल काबुन पळुन गेले. फिर्यादी यांनी भितीपोटी नमुद घटना न सांगता सकाळी सदर घटना हि त्यांचे वडीलांना सांगितले.

त्यानंतर फिर्यादी व त्यांचे वडील पोलीस स्टेशनला आलेनंतर फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक ६४४/२०२४ कलम ३०९ (६), ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरिष्ठांचे सुचनानुसार गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी जिल्हा सामान्य रूग्णालय परीसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज पाहणी करून तसेच गुप्तबातमीदार यांनी दिलेल्या माहितीचे अनुषंगाने आरोपी नामे शुभम उर्फ बांबु अमर समुद, वय २८ वर्षे, रा.पंचशील चौक घुटकाळा वॉर्ड, चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेला एक realme कंपनीचा वापरता मोबाईल कि. १०,०००/-रू, फिर्यादी यांचे बँक पासबुक तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकु असा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीचा साथीदार व उर्वरित रोख रूपये यांचा तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का -पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु- अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव- उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात – प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे सुचनेप्रमाणे मंगेश भोगाडे स.पो. नि., संतोष निभोरकर पोउपनि, पोहवा/महेद्रं बेसरकर, पोहवा/सचिन बोरकर, पोहवा निलेश मुडे, मषोहवा/भावाना रामटेके, पोहवा/संतोष पंडीत, पोशि/इम्रान खान, पोशि/संतोष कावळे, पोशि/दिलीप कुसराम, पोशि/शाहवाज, पोशि/रूपेश रणदिवे, पोशि/रूपेश पराते, पोशि/ इरशाद, पोशि/मंगेश मालेकर, पोशि/राहुल चितोडे गुन्हे शोध पथक, पो स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker