आपला जिल्हा
महाराष्ट्र बंद मध्ये उत्स्फुर्त पणे सहभागी व्हा.- खासदार प्रतिभा धानोरकर
मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

महाविकास आघाडी तर्फे उद्या दि. 24 ऑगस्ट 2024 रोजी महिला व मुलींच्या सुरक्षेसंदर्भात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या निषेध मोर्चाची सुरवात गांधी चौक, चंद्रपूर येथून सकाळी 11 वा. होणार आहे. तरी या निषेध मोर्चा मध्ये उत्स्फुर्त पणे सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.
देशातील केंद्र सरकार व राज्यातील शिंदे सरकार हे महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत पुर्णपणे अपयशी ठरले असून महिला सुरक्षित नसल्याचे चित्र संपुर्ण देशात निर्माण झाले आहे. बदलापूर च्या घटनेने चिमुकल्या मुली शाळेत देखील सुरक्षित नाही, हे दिसुन आले आहे. यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षेसंदर्भात राज्य सरकार च्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निषेध मोर्चा हा महिलांना न्याय मिळावा या उद्देशाने असून या निषेध मोर्चात सर्व नागरीकांनी व तसेच महाविकास आघाडीतले सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.