आज वन अकादमी येथे जागतीक फार्मासिस्ट दिवस चे आयोजन
मुख्य संपादक-हिमायूं अली, मोबाइल नंबर-8975250567

पत्रकार परीषदेत चंद्रपूर फार्मासिस्ट फोरम अध्यक्ष झाडे यांची माहिती
चंद्रपूर.जागतिक फार्मासिस्ट दिवस च्या निमित्ताने चंद्रपूर फार्मासिस्ट फोरम तर्फे 25 सप्टेंबर 2024 ला चंद्रपूर_मूल रोडवरील वन अकादमी येथील विद्युत सभागृह येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जागतिक फार्मासिस्ट दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहीती फोरम चे अध्यक्ष गणेश झाडे यांनी दीली आहे.
कार्यक्रमा मध्ये फार्मासिस्ट साठी वन एकेडमी परीसरात फार्मासिस्ट रैली, फार्मा पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, फार्मसी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वाचे एफडीए नागपूर येथील माजी सहाय्यक आयुक्त डा. पुष्पहास बल्लाळ व चेतन मारवार हे मार्गदर्शन करतील. याच दरम्यान रक्तदान शिविरा चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल. तसेच फार्मासिस्टांना कोरोना योध्दा मध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी केली.
कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने फार्मासिस्टांना सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान चंद्रपूर फार्मासिस्ट फोरम चे अध्यक्ष गणेश झाडे, सचिव पंकज देशमुख व अन्य सदस्यांनी केले आहे.
पत्रकार परीषदेला फोरम चे अध्यक्ष गणेश झाडे, उपाध्यक्ष श्रीकांत रेशीमवाले, सचिव पंकज देशमुख, सहसचिव तुषार सांबरे, जनसंपर्क अधिकारी कोमल पोतदार उपस्थित होते.