28 सप्टेंबरला जटपूरा गेट जवळ नागपूर कराराची होळी
मुख्य संपादक-हिमायूं अली, मोबाइल नंबर-8975250567

विदर्भ राज्य मागणी साठी 12 वर्षापासुन आंदोलन सुरू
पत्र परिषदेत वि.रा.आं.स. अध्यक्ष एड. चटप यांची माहिती
चंद्रपूर. मागील 12 वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणा_या नागपूर कराराची होळी 28 सप्टेंबर ला संपूर्ण विदर्भातील जिला तसेच तालुका स्तरावर करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात जटपूरा गेट जवळ गांधी पूतला समोर शनिवार 28 सप्टेंबरला नागपूर कराराची होळी करण्यात येणार असल्याची माहीती विदर्भ राज्य आंदोलन समिति चे अध्यक्ष एड. वामनराव चटप यांनी श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परीषदेत दिली.
एड. चटप यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन 64 वर्षे लोटुनही सत्तेतील राज्यकर्तयांनी नागपूर करार न पाळण्याचे सरकारी धोरण अवलंबले आहे. विदर्भात बारमाही नद्या, विपुल खनिज संपत्ती, असाधारण वनसंपदा तसेच अत्यंत कुशल मनुष्यबळ असूनही विदर्भाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. नैसर्गिक संपत्तीचा विदर्भाव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर सर्व विभागांना पुरवठा केला जातो. त्यामुळे सिंचनाचा अनुशेष, बेरोजगारी, अत्यल्प वीज पुरवठा अश्या अडचणींना विदर्भाच्या जनतेला तोंड द्यावे लागत आहे. यावर आजपर्यंत सकारात्मक तोडगा काढण्यात आलेला नाही.
विदर्भात सिंचनासाठी प्रस्तावित धरणे व काम सुरु होऊन सुद्धा अपूर्ण राहिलेली सिंचन प्रकल्प यामुळे पूर्व व पश्चिम विदर्भातील एकूण १४ लाख हेक्टर जमीन सिंचना आली नाही. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष ६० हजार कोटींच्या वर गेला आहे. सोबतच शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, विद्युतीकरण, आदिवासी विकास कार्यक्रम आणि समाज कल्याण व ग्रामविकास या क्षेत्राचा अनुशेष सुद्धा १५ हजार कोटींच्या वर गेलेला आहे. त्यामुळे वाढती बेरोजगारी, हवालदिल शेतकरी, आत्महत्येला प्रवृत्त झालेले त्याचे परीवार असे अत्यंत भयावह चित्र असून त्याचा कल नक्षली चळवळीकडे वाढला आहे. विदर्भात कोळसा वर आधारित वीज निर्मिती पैकी 87 टक्के वीज उर्वरित महाराष्ट्रातील उद्योगधंदे, शेती व सार्वजनिक उपयोगासाठी वापरण्यात येते. मात्र विदर्भात सध्या दैनंदिन गरजा सुद्धा भागात नसल्यामुळे तेथे नेहमीच काळोख पसरलेला असतो. विदर्भात प्रदुषणाचा प्रश्न सुद्धा ऐरणीचा बनला आहे त्यामुळे येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समिती मागील 12 वर्षांपासून आंदोलन ची सुरू ठेवुन विदर्भ राज्य मागणीची धग कायम ठेवत आहे. फसव्या नागपूर करारामुळे 64 वर्षे लोटूनही राज्यकर्त्यांनी करारपुर्ती न केल्यामुळे विदर्भातील जनतेवरील अन्यायाची मालिका कायम राहिली आहे. निर्णायक तोडगा काढण्याच्या दृष्टीने तसेच नव्या सरकारला गंभीर इशारा देण्याच्या उद्देशाने नागपूर करार जाळून येथील जनसामान्याच्या प्रश्नांच्या तीव्रतेची जाणीव करून देण्यासाठी व लोकजागर साठी शनिवार 28 सप्टेंबर 2024 ला विदर्भातील सर्व जिल्ह्यासोबतच, तालुक्यात व शहरातील जटपूरा गेट येथील गांधी पूतळया समोर नागपूर कराराची होळी विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारे करण्यात येणार आहे अशी माहीती एड. चटप यांनी दिली.
पत्रकार परीषदेला वि.रा.आं.स. चे अध्यक्ष एड. वामनराव चटप, किशोर दहेकर, कपिल इद्दे, अंकुश वाघमारे, मितीन भागवत, सुदाम राठोड, अनिल दिकोंडवार, गोपी मित्रा, मुन्ना आवळे, मुन्ना खोब्रागडे, माकोडे, मारोतराव बोथले, रमेश नळे, मधु चिंचोलकर, पपीता जुनघरे, एड. रूपेश सुर, आनंदराव खर्डीवार इ. उपस्थित होते.