डा. बाबासाहेब आंबेडकर स्मारकसाठी रेस्ट हाऊस ची जागा द्यावी
मुख्य संपादक-हिमायूं अली, मोबाइल नंबर-8975250567

पत्रपरीषदेत डा. अभिलाषा गावतुरे ची मागणी
चंद्रपूर.विश्वरत्न महामानव डा. बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकार नाकारणा_या देशातील जातीवादी समाज व्यवस्थेला नाकारत 14 आक्टोंबर 1956 ला नागपूर तर 16 आक्टोबर 1956 ला चंद्रपूर येथे लाखों अनुयायासोबत मानवतावादी बौध्द धम्माची दिक्षा घेतली. सध्या स्थितीत दिक्षा भूमी ची जागा 15 व 16 आक्टोबरच्या धम्मचक्र अनुप्रवर्तन या कार्यक्रमासाठी अपुरी पडत असल्याने जागेची कमतरता दूर करण्याकरिता चांदा क्लब मैदान ची जागा व डा. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी शासकिस विश्राम गृहाची जागा देण्यात येण्याची मागणी भूमिपुत्र ब्रिगेड च्या मार्गदर्शक डा. अभिलाषा बेहेरे_गावतुरे यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परीषदेत केली.
डाक्टर आंबेडकर हे केवळ भारताचा अभिमान नाही तर संपूर्ण विश्व त्यांना सिम्बाल आफ नालेज म्हणत होते. त्यांनी केवळ जगातल सर्वोत्तम अस संविधान लिहले व सर्व विश्वाला धम्म देऊन समता, स्वतंत्रता न्याय आणि बंधूतेची मूल्ये या मातीत रूजविली. मानवतावादी बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरीता चंद्रपूर येथील ऐतिहासिक दिक्षा भूमीचा विकास ही काळाची गरज आहे. सध्यास्थितीत दिक्षा भूमीची जागा अपुरी पडत असल्याने दिक्षा भूमिच्या विकासाकरीता जवळील चांदा क्लब मैदान ची जागा देण्याची मागणी डा. अभिलाषा गावतुरे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, आज चांदा क्लब मैदानाचा उपयोग केवळ मैदानी खेळ, मनोरंजन कार्यक्रम या व्यतिरिक्त दूस_या कोणत्याही कार्यक्रम येत नाही. अशा कार्यक्रमांसाठी 500 मीटर दूर जिला क्रिडा संकुल, पुलिस मुख्यालय मैदान आणि पुलिस मैदान उपलब्ध करून द्यावे. या मागणीला धरून 11 आक्टोबर ला आंबेडकरी अनुयायांकडून आयोजित मोर्चा ला भूमिपूत्र ब्रिगेड पाठींबा देणार असल्याची माहीती डा. अभिलाषा बेहेरे_गावतुरे यांनी दिली.
पत्रकार परीषदेला डा. अभिलाषा बेहेरे_गावतुरे, डा. राकेश गावतुरे, एड. प्रशांत सोनुले उपस्थित होते.