11 आक्टोबर ला आंबेडकर जनतेचा जिलाधिकारी कार्यालयावर मोर्चा
मुख्य संपादक-हिमायूं अली, मोबाइल नंबर-8975250567

पत्र परीषदेत बहुजन हितकारिणी सभा चे संस्थापक अध्यक्ष नगराळे यांची माहीती
चंद्रपूर.चांदा क्लब ग्राऊंड आणि चंद्रपूर चे विश्राम गृह याठीकाणी डा. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार करण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरी जनते तर्फे भन्ते ज्ञानज्योती यांचे नेतृत्वात 11 आक्टोबर ला दुपारी 12.30 वाजता एल्गार महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परीषदेत बहुजन हितकारिणी सभा चे संस्थापक अध्यक्ष व वंचित नेता बंडू नगराळे यांनी दिली.
स्थानिक डा. आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात होणार आहे. मेन रोड, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक होत मोर्चा जिलाधिकारी कार्यालय येथे पोहोचणार आहे. यात भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, अ.भा. रिपब्लिकन पक्ष, भीम आर्मी, रिपब्लिकन पक्ष खोरीप, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन एम्प्लाईज फेडरेशन आफ इंडिया, फुले आंबेडकर विचवार संवर्धन समिति, बामसेफ, मुलनिवासी संघ, आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी, डा. बाबासाहेब आबेडकर लायर्स, असोसिएशन, बुध्दिस्ट समन्वय कृती समिती, कास्ट्राईब संघटना, बानाई, बहुजन युवा कृती समिति आदि संघटना सहभागी होणार असल्याची माहिती बहुन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित नेता बंडू नगराळे यांनी दली आहे.
पत्रपरीषदेला खुशाल तेलंग, शिरीष मोगुलवार, देशक खोब्रागडे, किशोर तेलतुंबडे, प्रतिक डोर्लीकर, सुरेश नारनवरे, मृणाल मेश्राम, सुरेंद्र रायपुरे, राजकुमार जवादे, अंकुश वाघमारे, सत्यजित खोब्रागडे, राजस खोब्रागडे, मुन्ना खोब्रागडे, कोमल रामटेके आदि उपस्थित होते.