ताजे अपडेट

सांगोला तालुक्यात बेकायदेशीर-अवैधरित्या होत असलेले वाळू उत्खनन तत्काळ थांबवावे व कायदेशीर कारवाई करावी

एकनाथ उर्फ ​​विकास हणमंत शेंबडे रा. कमलापूर यांची मागणी

सांगोला: गेली ३० दिवस सतत सांगोला, नाझरा मठ ते सावे, बामणी सांगोला या ठिकाणी सतत रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत माझ्या दोन चाकी गाडीवर फेऱ्या मारत आहे. त्या दरम्यान मला नाझरा मठ इथून टोलनाक्यापासून अंदाजे पाच ते सहा किलोमीटरवर जवळजवळ सहा ते सात किलोमीटरवर वाळू उत्खनन करत असलेले बेकायदेशीर पॉईंट चालू असल्याचे निदर्शनास आले. हे वाळू उत्खनन नदीतून एका पॉईंटला चार ते पाच ट्रॅक्टरच्या माध्यमातून जेसीबीच्या साह्याने भरून वाळू नदीपासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर आणून टाकली जाते. तेथून जेसीबी मशीनच्या सहाय्याने चार ब्रास चे टिपर, ट्रक व दोन ब्रास चे टिप्पर मध्ये वाळू भरून दिली जाते.

सांगोला तालुक्यातून नाझरा मठ, नाझरा, उदनवाडी व येथील आसपासच्या गावातून बेकायदेशीर अवैधरीत्या वाळूचे पॉईंट चालू आहेत. खुलेआम या परिसरातून वाळू वाहतूक केले जात आहे. तो अवैद्य वाळू साठा, उपसा व वाहतूक बंद करून सहकार्य करावे, व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एकनाथ उर्फ ​​विकास हणमंत शेंबडे रा. कमलापूर यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे कडे केली आहे. त्याच्या प्रती कार्यवाही करीता विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर, उप विभागीय अधिकारी मंगळवेढा, विभागीय पोलीस उपअधीक्षक, मंगळवेढा. व पोलीस निरीक्षक, सांगोला पोलीस स्टेशन, सांगोला यांना दिल्या आहेत.                                   सांगोला तालुक्यातील बेकायदेशीर अवैध वाळू माफियांवर कारवाई करावी याकरिता 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी उपोषण देखील करण्यात आले होते, या उपोषण स्थळी तहसीलदारांनी संबंधित वाळूमाफियावर कारवाई करू वाळू उपसा बंद करू असे सांगितले होते.तरी पण कोणतीच कारवाई झाली नाही सांगोल्याच्या आमसभेमध्ये देखील हा विषय मांडण्यात आला होता तेथे देखील लोकप्रतिनिधी समक्ष वाळू उपसा बंद करू असे तहसीलदार यांनी सांगितले होते, एवढे करून देखील वाळू उपसा बंद होत नसल्याने नेमके पाणी कुठे मिळत आहे? याची चर्चाही सांगोला तालुक्यात सुरू असून वाळूमाफिया यांचा वाढलेला जोर यापुढे प्रशासनाची हतबलता स्पष्ट होत असल्याची ही चर्चा या निमित्ताने सांगोला तालुक्यातील जनतेमधून सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker