कलबुर्गी-कोल्हापूर- कलबुर्गी एक्सप्रेस रेल्वेस उद्यापासून सांगोला येथे थांबा
सांगोला येथे थांबा मिळाल्याने प्रवासी वर्गात आनंद

सांगोला :कलबुर्गी-कोल्हापूर- कलबुर्गी एक्सप्रेस रेल्वेस सांगोला रेल्वे स्टेशनला थांबा मिळालेला होता,ही एक्सप्रेस रेल्वे रविवार दिनांक 11 मार्च 2024 नियमितपणे सांगोला येथे दोन मिनिट थांबणार आहे, या एक्सप्रेस रेल्वेला सांगोला येथे थांबा मिळाल्याने प्रवासी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.सांगोला तालुक्यातील नागरिकांना कोल्हापूर,मिरज, कुर्डूवाडी, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वेची सोय होणार आहे. या एक्सप्रेस रेल्वेस थांबा मिळण्या करिता पंत्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत मागणी करण्यात आलेली होती तसेच सांगोला शहरातील अनेक सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी यांनी देखील पाठपुरावा केलेला होता. कोल्हापूर कडे जाताना ही गाडी नंबर 22155 सकाळी 10.43 मिनिटांनी येवुन 10.45 ला रवाना होईल. कलबुर्गी कडे जाताना ही गाडी नंबर 22156 संध्याकाळी 6.13 मिनिटांनी येवुन 6.15.मिनिटांनी रवाना होईल.