राजकारण
Trending

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज रोजी पर्यंत एकूण 22 उमेदवारांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

रणजितसिंह निंबाळकर, धेर्यशिल मोहिते-पाटील, राम सातपुते यांचे उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज रोजी पर्यंत एकूण 22 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

43 माढा लोकसभा मतदारसंघातून आज लोकसभेसाठी 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.
1. रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टी.
2. खरात संदीप जनार्दन, अपक्ष
3. मोहिते पाटील विजयसिंह शंकरराव, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
4. मोहिते पाटील धैर्यशील राजसिंह, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार
5. संतोष बाळासाहेब बिचुकले, आर पी आय ए
6. भाऊसाहेब सुखदेव लिगाडे, अपक्ष
7. गणेश अशोक चौगुले, अपक्ष.

42 लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी 10 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

1. राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पार्टी,
2. संस्कृती राम सातपुते भारतीय जनता पार्टी
3. परमेश्वर पांडुरंग गेजगे अपक्ष
4. सौ. फुलारे श्रीदेवी जॉन अपक्ष
5. श्री विजयकुमार भगवान उघडे अपक्ष
6. दगडू पंढरीनाथ घोडके अपक्ष
7. श्री विद्या दुर्गादेवी मौलप्पा कुरणे अपक्ष
8. बनसोडे राहुल दत्तू अपक्ष
9. अण्णा सुखदेव मस्के अपक्ष
10. रविकांत रेवप्पा बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A.

दिनांक 12 एप्रिल रोजी 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी तर 15 एप्रिल रोजी 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते तर आज 16 एप्रिल रोजी 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज पर्यंत एकूण 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते तर 16 एप्रिल रोजी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत आज रोजी पर्यंत 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज रोजी पर्यंत एकूण 22 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker