चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमधील ५० विद्युत ठेकेदारांच्या बिलाची रक्कम त्वरित अदा करा
हिमायूं अली,मुख्य - संपादक आरटीआई न्यूज,मोबाइल नंबर - 8975250567

संघटनेची पत्रपरिषदेत मागणी, अन्यथा कामबंद आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून मागील वर्षे २०२५-२६ पासून आजपर्यंत अनेक कामांची देयके बजेट नसल्यामुळे अदा करण्यात आलेली नाहीत. कामे पूर्ण करून ही संबंधित ठेकेदारांना त्यांच्या बिलांची रक्कम मिळालेली नसल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
दुसरीकडे, बजेटच्या अभावामुळे नवीन कामांना मंजुरी मिळत नसून कामे करून सुध्या नवीन वर्क ऑर्डर देखील दिल्या जात नाहीत. वीज वितरण व्यवस्थेच्या विकासासाठी दिवस-रात्र मेहनत घेणारे ठेकेदार व कामगार आज शासनाच्या दुर्लक्षामुळे अडचणीत सापडले आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास अनेक ठेकेदार व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर जातील व हजारो कामगार कायमस्वरूपी बेरोजगार होतील.
एप्रिल २०२५-२६ पासूनची प्रिव्हेंटीव्ह व ब्रेक डाउन मेन्टेनन्स तसेच र्एण् व Dझ्Dण् सर्व प्रलंबित बिले तात्काळ अदा करण्यात यावीत. वीज वितरण कंपनीसाठी वर्षे २०२६-२७ चे आर्थिक वर्षाकरिता आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा. प्रलंबित असलेल्या मागील वर्षांमधील झालेल्या कामाचे मेन्टेनन्स वर्क ऑर्डर व पर्चेस वर्क ऑर्डर देऊन सदर कामांच्या देयकांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा. चालू वर्षात नवीन विद्युत कामे, देखभाल व दुरुस्ती ची कामे व विकास कामांसाठी तात्काळ वर्क ऑर्डर जारी करण्यात याव्यात.
ठेकेदारांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन बँक गॅरंटी व इतर आर्थिक अटींमध्ये शिथिलता देण्यात यावी. वरील मागण्या येत्या तीन दिवसात पूर्ण न झाल्यास चंद्रपूर विधुत कॉन्ट्रॅक्टर अससोसिएशन तर्फे संपूर्ण चंद्रपूर जिल्हामधील विद्युत कंत्राटदारानि बेमुदत कामे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे या कालावधीत वीज ग्राहकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्यास महावितरण जबाबदार राहिल.



