
सांगोला : नगरपालिके मध्ये गेले 2 वर्ष झाले प्रशासक नियुक्त कारभार असल्यामुळे सांगोला शहरात आरोग्याच्या दृष्टीने दिवसों दिवस नागरिकांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.सांगोला नगरपालिकेत नगरसेवक पद रिक्त असल्या कारणाने शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे,सांगोला शहरात बहुतेक भागात गटारी आहेत ,पण काही भागा मध्ये गटारी असून त्या गटारीची लाईन लेव्हल न काढता गटारी केल्यामुळ्ये अनेक गटारी तुडुंब भरून शहर उपनगरातील रस्त्यांवर सांडपाणी वाहत आहे, उपनगरातील अल राईन नगर भागामध्ये गटारी नसल्यामुळे नागरिकांनी आपल्या घराजवळ शोषखड्ड काढलेत,मात्र आज ते खड्डे भरून तलावात रुपांतर झाले आहे.आज ह्या परिसरात डेंग्यू सारख्या आजाराच्या विळख्यात नागरिक सापडत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. अशीच परिस्थिती उपनगरातील अनेक भागात आहे.नागरिकांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असे या परिसरातील नागरिक बोलू लागले आहेत.
सांगोला शहरात गेले वर्ष भरा पासून व्हक्युम मशीन (सांडपाणी उपसा यंत्र)बंद असुन संबधीत अधिकाऱ्यास नागरिकानी सांडपाणी उपसून नेण्यास सांगितल्यास ते खाजगी उपसा मशीन वाल्याशी संपर्क करण्याचा सल्ला देतात, नगरपालिकेतील जबाबदार आधिकारी जर असे नागरिकाना वागणूक देत असतील तर नागरिकांनी घर पट्टी पाणी पट्टी व इतर टॅक्स का भरावा ?असा प्रश्न नागरिकांतून विचारला जावू लागला आहे.