ताजे अपडेट

जिथं..जिथं गलथानपणा दिसून आला तिथं..तिथं..अधिकारी असो किंवा ठेकेदार असो एकालाही सोडणार नाही- आ. ॲड. शहाजीबापू पाटील

विविध विषयांवर सांगोल्यातील आमसभेमध्ये पाच तास वादळी चर्चा

सांगोला: पु.राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम, मोडलेल्या खुर्च्या, जलजीवन कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार, मराठा कुणबी आरक्षण, अवैद्य वाळू उपसा, निकृष्ट रस्ते अशा विविध विषयांवर सांगोल्यातील आमसभेमध्ये पाच तास वादळी चर्चा झाली. महसूल, पोलीस, नगरपालिका, पाणीपुरवठा अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार केला.

     आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार (ता. 14) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, बाबुराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब देशमुख, खंडू सातपुते, तानाजी पाटील, दादासाहेब लवटे, गुंडा खटकाळे, सूरज बनसोडे, अभिषेक कांबळे, संतोष देवकते, संजय देशमुख, शहाजीराव नलवडे, अरविंद केदार, अशोक शिंदे, आनंद माने, संभाजी आलदर, प्रांताधिकारी आर. बी. माळी, समाधान घुटूकडे, तहसीलदार संतोष कणसे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे इत्यादी अधिकाऱ्यांसह तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आमसभेच्या वेळी तानाजी बाबर, अरविंद केदार, अरविंद केदार, अशोक गावडे, एकनाथ शेंबडे, शरयू कोळेकर, नामदेव लवटे, संतोष देवकते, बाळासो काटकर, अभिषेक कांबळे, बाळासाहेब वाळके, दादासो लवटे, बाबुराव गायकवाड इत्यादींनी समस्या मांडल्या.

जिथं..जिथं गलथानपणा दिसून आला तिथं..तिथं..अधिकारी असो किंवा ठेकेदार असो एकालाही सोडणार नाही. जनतेच्या सहकार्याशिवाय तालुक्याचा विकास होत नाही. पाण्याची पातळी खालावल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाई काळात कोणत्याही गावाला पाण्याची अडचण येणार नाही, तलाठी, ग्रामसेवकांना नेमणूकीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक करावे. संपूर्ण तालुक्यातील वाळू एकदाच बंद करून टाका. अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांची दखल घ्यावी. जिथे आवश्यकता असेल तर टँकर द्यावेत. अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना पाठीशी घालू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. खोटं बोलणाऱ्या आणि कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही इशारा आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला. तसेच पु. राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या नूतनीकरण- सुशोभीकरण करण्यात आलेल्या कामाची चौकशी केल्याशिवाय कंत्राटदाराचे बील देण्यात येवू नये असे त्यांनी यावेळी सांगितले.

  सांगोला तालुक्याला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला असल्याने अधिकाऱ्यांनी कामांची क्वालिटी जपण्याचे काम करावे. तलाठी, ग्रामसेवकांनी गावात थांबून जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. माणसाबरोबर जनावरांना देखील पाणी देण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे. भूमी अभिलेख विभागात सावळा गोंधळ आहे. दुष्काळातील आमसभेसाठी विभाग प्रमुख उपस्थित राहत नसल्याने आमदार माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker