जादुटोणा करते म्हणुन भाच्याने केला आत्याचा खून
धायटीतील वन विभागाच्या जागेत सोमवारी आढळला होता मृतदेह

सांगोला :धायटी (ता. सांगोला) येथील द्वारका बबन माने हिच्या मृत्यूचे रहस्य उलगडले असुन तिच्या भाच्याने तिचा ती जादूटोणा करते म्हणून चिडून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले. याबाबत हकिकत अशी, सोमवारी शिरभावी गावालगत असलेल्या वन विभागाच्या जागेत एका ५५-६० वर्षीय महिलेचा मृतदेह दगडाने धार शस्त्राने वार करून खून कोल्यात मिळून आला होता. द्वारका माने या आपल्या दोन चाटत राहत होते. त्या ११ मार्च रोजी आल्या आपल्या भावाकडे राहण्यास गेल्या होत्या. त्याचवेळी भाच्याने आपली आत्या आपल्यावर जादुटोणा करते,त्यामुळे आपल्या घराची प्रगती नाही म्हणून चिडून जाऊन शिरभावीमधील फॉरेस्टमध्ये तिला मारून टाकले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूरचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे सहायक पोलिस निरीक्षक सूरज निंबाळकर आदींनी दोन पथकाच्या साह्याने सांगोला पंढरपूर, अक्कलकोट येथे सदर आरोपींचा शोध घेऊन खबऱ्यामार्फत त्याला अक्कलकोट येथे १४ मार्च रोजी अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपण आपल्या आत्याला धारदार चाकू व दगडाने ठेचून मारण्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश गायकवाड, सहाय्यक पोलिस फौजदार श्रीकांत गायकवाड पोलिस हेडकॉन्स्टेबल सलीम बागवान हरिदास पांढरे विजयकुमार भरले. धनराज गायकवाड, यश देवकते, समर्थ गाजरे यांनी केली.