आरटीआय न्युज स्पेशलताजे अपडेट
Trending

अनकढाळ टोल नाक्यावर महामार्ग पोलिसांची “वाटमारी”

टोलनाक्यावरील टोळधाडीला आवर घालणार तरी कोण...? नागरिकांचा सवाल

 

 

सांगोला : रत्नागिरी- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर सांगोला तालुक्याच्या हद्दीत असलेल्या अनकढाळ टोल नाक्यावर वाहतुकीच्या नियमावर बोट ठेवून आणि कारवाईची भीती घालून महामार्ग पोलिसांकडून राज्यातील आणि परराज्यातील वाहनधारकांची अक्षरशः वाटमारी सुरू असल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. दिवसभर येथील टोल नाक्यावर ४ ते ५ पोलीस कर्मचारी आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी अशी पोलिसांची टोळ-धाडच वाहन चालकांकडून वसुली करण्यासाठी उपस्थित असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे.रत्नागिरी- नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग पुढे नागपूर, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पंढरपूर तसेच हैदराबाद सह अन्य महत्त्वपूर्ण शहराच्या दिशेने जात असल्याने या महामार्गावरून दिवसभर लाखो वाहने ये जा करत असतात. या महामार्गावर रात्रंदिवस वाहनांची मोठी वर्दळ असते. याच संधीचा फायदा घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या पोलिसांकडून सांगोला तालुक्याच्या हद्दीत असलेल्या अनकढाळ टोलनाक्यावर इतर राज्यातील पासिंग असलेली वाहने अडवून त्यांच्याकडन पठाणी पद्धतीने वसुली केली जाते. गाडीची कागदपत्रे, पासिंग, विमा, पीयूसी, ड्रायव्हरचे लायसन, नंबर प्लेट, तसेच वेग मर्यादा आणि अन्य नियमावर बोट ठेवून टोल नाक्यावर वाहने अडवली जातात, अपूर्ण कागदपत्रे असलेल्या वाहनाकडून तब्बल ५०० ते १००० रुपये आणि कागदपत्रे पूर्ण असूनही सरसकट १०० ते ३०० रुपयांची वसुली वाहनाकडून केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सांगोला तालुक्यात घडू लागला आहे.

टोलनाक्यालाच आपल्या वसुलीचा अड्डा बनविलेले महामार्ग पोलीस दिवसभर महामार्गावर कुठेही आढळून येत नाहीत. सकाळी ६ पासून ते मध्यरात्री उशिरापर्यंत महामार्ग पोलीस आणि अधिकारी या टोल नाक्यावरच ठिय्या मांडून बसलेले पाहायला मिळतात. अनेकवेळा महामार्ग पोलीस आणि अधिकाऱ्यांकडून स्थानिक नागरिकांनाही उद्धट वागणूक मिळत असल्याचे प्रकार घडले आहेत. महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नेमलेले अधिकारी कर्मचारी आपल्याच धुंदीत मस्त आहेत. रत्नागिरी- नागपूर हा महामार्ग म्हणजे आपल्याला वरिष्ठ प्रशासनाने दिलेली जहागिरी आहे, आणि यावरून धावणाऱ्या वाहनाकडून आपण कितीही आणि कशीही वसुली करू शकतो. अशाच अविर्भावात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वागत आहेत. यामुळे अनेक वाहनचालक रत्नागिरी-नागपूर या महामार्गावरून प्रवास करणे टाळून वाट वाकडी करत असल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनालाही मोठे नुकसान सोसावे लागत आहे.महामार्गावरून चालणाऱ्या वाहन चालकांची वाटमारी करणाऱ्या महामार्ग पोलिसांना वरिष्ठांनी तात्काळ आवर घालावा अशी मागणी सांगोला तालुक्यातून पुढे येऊ लागली आहे.                                     दररोज लाखो रुपयांचे कलेक्शन असुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही पोलीस कर्मचारी व एक पोलीस अधिकारी यांची नेमणूक केली आहे. कर्मचारी व अधिकारी सर्वच जण दिवसभर अनकढाळ येथील टोल नाक्यावर ठिय्या मांडून बसलेले असतात. टोलनाक्यावर वाहने अडवून सेटलमेंट करणे सोपे असल्यानेच त्यांनी हे ठिकाण निवडले आहे. दररोज अशी वाहने अडवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची वसुली केली जात असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker