आपला जिल्हा

*वयोवृद्धांचे हक्काचे घर हिसकावणाऱ्या इसमांवर कारवाई करा:-राजु झोडे*

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

*पळसगाव येथील वयोवृद्ध कुटुंबाचे न्यायासाठी आमरण उपोषण*

 

*बल्लारपूर:-* तालुक्यातील मौजा पळसगाव येथील वयोवृद्ध नागरिक सौ. ताराबाई मारोती गोहणे वय ६५ वर्षे व त्यांचे पती मारोती लक्ष्मण गोहणे वय ७० वर्षे यांची गावातील कासारे आडनावाच्य इसमानी त्यांच्या मिळालेल्या हक्काच्या घरकुलावर मागील वर्षापासून कब्जा केला आहे. सदर हक्काचे घर वयोवृद्धांना मिळाले पाहिजे याकरिता या वृद्ध दाम्पत्यांनी आपल्या कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे. सदर माहिती उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचितचे नेते राजू झोडे यांना मिळताच त्यांनी उपोषण स्थळी भेट दिली. या वृद्ध दाम्पत्यांना तात्काळ न्याय द्यावा व घर हडप करणाऱ्या इसमावर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे राजू झोडे यांनी केली.
सदर वृद्ध दाम्पत्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला होता. हडप करणाऱ्या इसमानी वृद्ध दाम्पत्यांना आमिष दाखवून चौकातले घर हडप केले व त्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू केला. या वृद्ध दांपत्यांनी आमचे हक्काचे घर आम्हाला परत द्या अशी विनवणी केली असता त्यांनी बळजबरीने हे घर तुम्हाला देणार नाही असे ठणकावून सांगून वृद्ध दाम्पत्यांना हाकलून लावले. त्यामुळे हे वृद्ध दाम्पत्य आपल्या हक्काच्या घरापासून वंचित असून त्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयच्या पुढे मागील पाच दिवसापासून उपोषण करत आहे तरी अजून प्रशासनाला याबद्दल जाग आली नाही. एकीकडे सरकार व प्रशासन मोठ मोठ्या घोषणा करते व दुसरीकडे गरिबांवर अन्याय होत असताना दुर्लक्ष करून अन्याय करणाऱ्याला मदत करते. ही फार मोठी विडंबना असून सदर वृद्ध दांपत्यांना हक्काचे घर मिळाले पाहिजे याकरिता राजू झोडे यांनी उपोषणास्थळी भेट देऊन प्रशासनाला गंभीर इशारा दिला.
जेव्हापर्यंत न्याय मिळणार नाही तेव्हापर्यंत हा लढा सुरूच राहणार व या लढ्याला मी स्वतः न्यायीक मार्गाने मदत करणार असे प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू झोडे यांनी सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker