नाझरे ता. सांगोला येथील पॉस्को अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीची जामीनावर सुटका
पंढरपूर येथील सत्र न्यायालयाचा निर्णय; आरोपीचे वकील ॲड. सागर बनसोडे यांची माहिती

सांगोला :नाझरे येथील पॉस्को अंतर्गत आरोपीची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. ॲड. सागर बनसोडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जामीनावर सुटका झाली आहे.सांगोला पोलीस स्टेशन येथील गु. र . न. ९१/२०२४ मधील नाझरे येथील मयुर ऊर्फ बिरू सर्जे याचेविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ ड १, ३४१,५०६ व पॉस्को कायदा कलम ८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
आरोपीच्या वतीने सत्र न्यायालय पंढरपूर येथे जामीन अर्ज दाखल केला होता. सदरकामी आरोपीचे वकील ॲड. सागर बनसोडे यांचा युकतीवाद ग्राह्य धरून पंढरपूर येथील सत्र न्यायाधीश मा. तोष्णीवाल साहेब यांनी दिनांक २८ मार्च २०२४ रोजी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. त्याप्रमाणे आरोपीची जामीनावर मुक्तता करण्यात आली.आरोपीच्या वतीने ॲड. सागर बनसोडे, ॲड. प्रशांत चंदनशिवे व ॲड. विजय हजारे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲड. गोरे यांनी काम पाहिले.