ताजे अपडेट

समता पंधरवड्या निमित्त जातवैधता प्रमाणपत्राकरिता विशेष मोहिम

 

सोलापूर : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे समता पंधरवड्यानिमित्त इयत्ता आकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम 2023-24 मधील सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. बी.जी.पवार यांनी सांगितले.

या मोहिमेदरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तालुका व महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती समानसंधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत. समता पंधरवडयात सीईटी देणारे विद्यार्थी डिप्लोमा तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज देखील भरण्यात येऊन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी संबंधित महाविद्यालयातील समानसंधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.

                 चालु शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 व 12 वी विज्ञान शाखेत शिकणा-या व सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विदयार्थ्यांनी तात्काळ समितीकडे संपूर्ण कागदपत्रांसहित अर्ज सादर करावेत, जेणेकरुन विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पुढील शिक्षणासाठी वेळेत मिळेल. विदयार्थ्यांनी www.barti. Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांसाठी असलेला जात पडताळणीचा अर्ज ऑनलाइन भरावयाचा आहे. त्याची प्रिटआऊट काढून घ्यावी. त्याबरोबर आवश्यक ते सर्व शैक्षणिक, महसुली पुरावे व साक्षांकित प्रती जोडून अर्ज जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर कार्यालयात समक्ष सादर करावा. येताना सर्व मुळ कागदपत्रे आणावीत.असे आवाहनही जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. बी.जी.पवार यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker