धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याच हातात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी!!
16 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज

सोलापूर- धैर्यशील मोहिते यांनी आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे. अकलूजमधील एका कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते – पाटील यांनी विद्यमान खासदारावर निशाणा साधला. मोहिते -पाटील विरुद्ध निंबाळकर ही लढत राज्यातील लक्षवधी लढती पैकी एक होणार असून मोहिते-पाटील यांच्या अस्तित्वाची तर भाजपच्या प्रतिष्ठेची होणार आहे.
माढ्यामधून भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर मैदानात आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असल्याने त्यांची माढ्यातून उमेदवारी पक्की झाली आहे. मोहिते १६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. रणजीतसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते-पाटील अशी काटे की टक्कर माढ्यात होईल असं बोललं जातंय. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.