ताजे अपडेटशेतीवाडी
Trending

सांगोला तालुक्यातील दुष्काळ अनुदान नुकसान ५५१०७ खातेदारांच्या त्र्यांऐंशी कोटी सव्वीस लाख एकोनव्वद हजार सदोसष्ट रुपयेच्या यादया, रजिस्टर्ड पंचनामा शासनाच्या पोर्टलवर अपलोड

उर्वरित शेतकरी खातेदारांनी खरीप २०२३ दुष्काळ अनुदान मिळणेकामी विहित नमुन्यातील अर्ज सबंधित तलाठी यांचेकडे जमा करण्याचे प्रशासनाकडून आवाहन

सांगोला : महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. एसीवाय-२०२३/प्र.क्र.५८.म-७ दिनांक २९/०२/२०२४ अन्वये खरीप हंगाम २०२३ मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता सांगोला तालुकेतील बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी एकुण १५७,०७,६७०००/- (एकशे सत्तावन कोटी सात लाख सदोसष्ट हजार फक्त) एवढी रक्कम मंजुर करणेत आलेली आहे.

 

खरीप हंगाम २०२३ मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान प्रचलित कार्यपध्दतीनुसार वितरीत न करता MAHA IT यांचेकडुन विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीव्दारे वितरीत करण्याची कार्यपध्दती शासन निर्णय दि. २४/०१/२०२३ अन्वये निश्चित करण्यात आली आहे व त्यानुसार विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी यांना नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन त्यांनी आधार क्रमांकाव्दारे बायोमेट्रीक ओळख पटविणे आवश्यक आहे. दि. २१/०४/२०२४ रोजी पर्यंत सांगोला तालुक्यातील एकुण ५५१०७ खातेदार रक्कम रुपये ८३,२६,८९,०६७/ (त्र्यांऐंशी कोटी सव्वीस लाख एकोनव्वद हजार सदोसष्ट फक्त) रुपयेच्या यादया रजिस्टर्ड पंचनामा या शासनाचे पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत.

उर्वरित शेतकरी खातेदार यांनी लवकरात लवकर खरीप २०२३ दुष्काळ अनुदान मिळणेकामी विहित नमुन्यातील फॉर्म व त्यासोबत आधारकार्ड, बैंक पासबुक व ७/१२ उतारेची झेरॉक्स प्रत सबंधित तलाठी यांचेकडे जमा करणेबाबत प्रशासनाकडून विनंती करणेत येत आहे.

आजअखेर ३४७७८ खातेदार व त्यांची रक्कम ५४,९८,२४,६१८/- (चौपन्न कोटी अठ्यान्नव लाख चौविस हजार सहासे अठरा) एवढी रक्कम सबंधित शेतकरी यांचे खातेवर शासनाकडून DBT व्दारे जमा करणेत आलेली आहे. आज अखेर एकुण ९४१८ एवढया खातेदारांची ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. ई-केवायसी पुर्ण केलेले शेतकरी यांचे खातेवर शासनाकडून लवकरच अनुदान DBT व्दारे वितरीत करण्यात येणार आहे.

तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तलाठी यांचेशी संपर्क साधुन VK नंबर प्राप्त करून घ्यावा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी करणेबाबत प्रशानाकडून आव्हान करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker