
पंढरपूर : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जूनपासून श्री विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन सुरु होणार आहे.लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जूनपासून श्री विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन सुरु होणार आहे. याबाबतची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे प्रमुख गहिनीनाथ औसेकर यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरु होते. त्यामुळं विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन बंद होते. आता पुन्हा पूर्ववत दर्शन सुरु होणार आहे.मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचे चरण स्पर्श दर्शन बंद होते. कारण मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. हे काम पुढेही 17-18 महिने हे काम सुरु राहणार आहे. पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे.त्यामुळं येत्या 2 जूनपासून विठ्ठल मंदिर पूर्ववत पदस्पर्शाने सुरु करण्यात येणार असल्याची गहिनीनाथ औसेकर यांनी दिली आहे.
9 जूनपर्यंत ज्या राहिलेल्या कुटी पुजा आहेत, त्या सर्व देवाच्या पुजा होणार आहेत. देवाची तुळशी आणि पाद्य पुजा पर्ववत सुरु होणार असल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली.
73 कोटीच्या आराखड्यातील कामे सध्या सुरु विठ्ठल मंदिर विकासासाठी सुरु असलेल्या 73 कोटीच्या आराखड्यातील कामे सध्या सुरु आहेत. विठ्ठल मंदिराला पुरातन 700 वर्षापूर्वीचे रूप येऊ लागले आहे. सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी, फ्लोरिंग काढून टाकायचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळं संपूर्ण मंदिराला पुरातन काळातील दगडी फ्लोरिंग बसवण्यात येत आहे. मंदिरातील नंतरच्या काळात बसवण्यात आलेले मार्बल, ग्रॅनाईट आणि याच पद्धतीच्या चकचकीत फारशा काढून टाकण्यात येत असल्याने खऱ्या अर्थाने मंदिरातील पुरातन असणारा दगड आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे.