गुन्हेगारीताजे अपडेट
Trending

बस स्थानकातील चोऱ्या रोखण्याकरता प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी

अशोक कामटे संघटनेची निवेदाद्वारे मागणी

सांगोला : सांगोला बस स्थानकावर चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे याकरिता स्टॅन्ड परिसरात कायमस्वरूपी पोलीस नेमणूक करावी ,त्याचबरोबर एसटी प्रशासनाने देखील आवश्यक  त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने सांगोला पोलीस स्टेशन ,आगारप्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सांगोल्यासह महाराष्ट्रातील सर्वच स्थानकावर सुट्ट्यांचा कालावधी असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर आवक -जावक गर्दी आहे. त्यामध्ये असह्य उन्हाळा, एसटी बसेसची कमतरता असल्याने प्रवासी अनेक तासोंतास एसटीच्या प्रतीक्षेत असतात एकदा का एसटी स्टॅंडवर आली हे प्रवासी चढणे- उतरणे या गोंधळात धावपळीत असतात यावेळेस अनेक चोर बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी दबा धरून बसलेले असतात या गर्दीचा फायदा घेऊन सातत्याने मंगळसूत्र व दागिने चोरी ,पाकीट मारी होत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी या कारणाने त्रस्त आहेत, त्याकरिता एस.टी.महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये.

पूर्वीप्रमाणे गाडी स्थानकात प्रवेश केलेनंतर प्रथम प्रवास केलेल्या व स्थानकात ऊतरणारे सर्व प्रवाशांना उतरावे.नंतर पुढे मार्गस्थ होणा-या फलाटवर गाडी लावण्याची व्यवस्था करावी. याकरीता चालक, वाहकांना योग्य ते आदेश द्यावेत, तसेच बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवून त्यावरून नियंत्रण ठेवावे अशी सर्व आगारप्रमुख व वहातूक नियंत्रकांना विनंती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच आगारातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा, प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गर्दी असो वा नसो फलाटवरील प्रवाशांना विनासायास गाडीमध्ये चढता येईल.सध्याच्या व्यवस्थेमुळे शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.याची दखल महामंडळाने घ्यावी.विशेषता जेष्ठ नागरीक,अपंग तसेच महिलावर्गाला भयंकर त्रासाला जाऊन गाडीमध्ये चढ उतार करावी लागते हे वास्तव आहे.सामान -दागिणे यांची चोरी होणे ही नित्याची बाब झाली आहे.प्रवाशी सुरक्षेला प्राधान्य आहे की नाही.?बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मूलमंत्र आचरणात आणणार की नाही ? प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य फक्त लिहीणे वाचण्यासाठीच आहे काय ?  तेव्हा महामंडळाने त्वरीत सर्व आगारांना नोटीस काढून प्राधान्याने प्रवाशी उतरविणे नंतरच फलाटवर गाडी लावणेसाठी व्यवस्था अंमलात आणून प्रवाशांना होणाऱ्या गैरप्रकारातून सुटका करावी अशी मागणी होत आहे .या निवेदनाच्या प्रती , विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ,जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच विभागीय एसटी व्यवस्थापक सोलापूर यांनाही अशोक कामटे संघटनेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker