गुन्हेगारीताजे अपडेट
Trending

गोव्या हून येणाऱ्या पर्यटकांना रत्नागिरी-नागपूर हायवेवर पाचेगावात लुटले

लघुशंकेला गाडी थांबली असता चार सशस्त्र चोरटयांनी दागिने केले लंपास

सांगोला : उन्हाळी हंगामात गोव्यातील पर्यटनाचा आनंद लुटून गावाकडे परत निघालेल्या दाम्पत्याची सशस्त्र चोरट्यांनी वाटमारी करून दोन तोळे सोन्याचे दागिने लुटले. मिरज-सांगोला रस्त्यावर पाचेगाव (ता. सांगोला) येथे आज पहाटे हा प्रकार घडला. बाबासाहेब मल्हारी जगताप (वय ३७, रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) हे आपल्य पत्नीसह गोव्याची सफर करून कोल्हापूर मार्गे सोलापूरकडे परत येत होते. मिरज- सांगोला दरम्यान पाचेगावात उड्डाणपुलाजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास लघुशंकेसाठी बाबासाहेब जगताप हे आपल्या मोटारीतून उतरले.

तेव्हा चार सशस्त्र चोरट्यांनी जगताप दाम्पत्याला घेरले आणि लोखंडी सळई, पहार आदी हत्याराचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. जगताप दाम्पत्याच्या अंगावरील दोन तोळे सोन्याचे दागिने लुटून चोरटे पसार झाले. लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत ९७ हजार रूपये एवढी दर्शविण्यात आली आहे. चोरट्यांचा सांगोला पोलीस शोध घेत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker