काय कामं… काय निधी… समदं ओक्केमधी हाय…! सांगोला तालुक्यातील विकासकामांसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आणला साडेचार हजार कोटींचा निधी

सांगोला :महाराष्ट्रात प्रसार माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांवर काय झाडी काय डोंगर, काय हॉटेल हे वाक्य प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदारकीच्या मतदारसंघातील काळात विकास कामांसाठी कोट्यवधीच्या निर्धाचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. विधानसभा मतदारसंघातील रस्ते, सांस्कृतिक भवन, पाण्याच्या योजना, प्रशासकीय भवन, भुयारी गटार, दुय्यम निबंधक कार्यालय, ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब, शॉपिंग सेंटर, ईदगाह मैदान बासह सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निरा उजवा ४ नं. ब ५ नं. फाट्याला अतिरिक्त दोन टीएमसी पाणी मंजूर, स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला ८८३ कोटींचा निधी मंजूरकरून १२ गावांचा समावेश, दोन टीएमसी पाणी मंजूर झाल्याने ४० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार, म्हैसाळ सिंचन योजना ०.३५ टीएमसी पाणी नव्याने मंजूर ८ गावांचा समावेश व कोरडा नदीचा समावेश, टेंभू योजनेत १.६०० टीएमसी पाणी नव्याने मंजूर व माण नदीवरील १७ बंधारे व १९ गावांचा नव्याने समावेश वर्षांतून तीन आवर्तने मंजुर, शिरभावी पाणी पुरवठा योजनेचे पुर्नजिवन जलजिवनसह ८०० कोटींचा निधी मंजूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व बायपास रस्त्यास २७ कोटी मंजूर, मुस्लीम बांधवांसाठी इदगाह मैदानासाठी ४ कोटी रुपये निधी मंजूर, सांगोला शहरामध्ये १२५ कोटी रुपयांची भुयारी गटार बोजना प्रगतीपथावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी तालुक्यात चार कोटींची कामे मंजूर, सांगोला नगरपरिषदेच्या ३० कोटी मंजूर, मतदार संघातील भाळवणी गटातील १५ गावांसाठी रस्ते, पुल, समाजमंदीर बासह विविध विकास कामासाठी शेकडो कोटींचा निधी मंजूर, सांगोला महूद रस्त्यासाठी २२५ कोटींचा निधी मंजूर, १०३ गावांमध्ये कोट्यावधी रुपयांचे रस्ते, पुल, बंधारे तलाव, बाड्यावस्त्यांचे रस्ते, दिवाबत्ती, बहुउद्देशिय सभागृह, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाड्या, इमारत चांधकाम व सामाजिक विविध कामे मंजूर व प्रगतिपथावर, मुख्यमंत्री सहायता निधीतून गोरगरीबांसाठी आरोग्याची लाखो रुपयांचा निधी मंजूर, तब्बल १३४ वर्षानंतर सांगोला तहसील कार्यालयाच्या नुतनीकरण, फर्निचर व रंगरंगोटीसाठी ३५ लाख रुपये निधी मंजूर, शासनाच्या रोजगार हमी योजना विभागाकडून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेतून तालुक्यातील ४४ गावातील १४ कोटींच्या ५८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मंजुरी, म्हैशाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन कामाच्या २५ कोटी ८७ लाखांचा निधी मंजूर, शिरभाची पाणीपुरवठा योजनेची आधुनिक पाईपलाईन व दुरुस्तीसाठी २९९ कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध, जलजीवन मिशन योजनेंतर्गत गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी, मतदारसंघातील रस्त्यांसाठी वर्षभरात १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर, मतदारसंघातील ४३ गावातील ४५ विविध कामांसाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर, नगरपरिषद प्रशासकीय नवीन इमारत ब शहरांतर्गत असणाऱ्या विविध रस्ते कामांसाठी २० कोटीचा निधी मंजूर, शहरातील भीमनगर येथील दीक्षाभूमी कट्यासमोर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर, बंदेमातरम चौक ते मिरज रोड बायपास रस्त्याला १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.