ताजे अपडेट
Trending

ओबीसी समाजाच्या वतीने उद्या शुक्रवारी सांगोला बंदची हाक

सांगोला :सांगोला तालुक्यातील सर्व ओबीसी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सांगोला येथे मीटिंग पार पडली त्या मीटिंगमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षण बचावासाठी सांगोला तालुका उद्या शुक्रवारी बंद ठेवण्याचे तसेच नाझरा टोल नाका येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्याचे एकमताने ठराव करण्यात आला.त्यानंतर सांगोला तहसीलदार सांगोला पोलीस स्टेशन यांना सांगोला बंदचे निवेदन देण्यात आले. सर्व व्यापारी वर्गाने ही एक मताने बंद ठेवून पाठिंबा छोटे मोठे उद्योग धंदे व्यापारी वर्ग यांनी बंद ठेवून सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला.ओबोसी आरक्षण बचावा साठी राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री अंबड येथे तसेच पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री मंगेश ससाणे,मृणाल ढोले पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा विरोध नाही परंतु ओबीसी समाजावर अन्याय करून आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी ओबीसी समाजाकडून बोलले जात आहे. शेकाप चे नेते बाबासाहेब देशमुख, मारुती आबा बनकर,सांगोला सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी,उद्योगपती बाळासाहेब एरंडे,मा.नगरसेवक शिवाजी बनकर, मा.नगरसेवक आनंदा माने, सुरेश आदाटे,माळी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सोमनाथ राऊत,सावता परिषद सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष सयाजी बनसोडे,उल्हास धायगुडे पाटील,अमोल खरात, तानाजी खंडागळे,ज्ञानेश्वर इमडे,यशवंत सेना सांगोला तालुकाध्यक्ष आनंदा मेटकरी,सावता परिषद सांगोला तालुका अध्यक्ष संतोष टाकळे, मनसे अध्यक्ष विशाल गोडसे,दत्ता जानकर, संतोष कारंडे,सोमनाथ आदलिंगे,प्रतिक बनसोडे,समता परिषद सांगोला तालुकाध्यक्ष मधुकर माळी,समता परिषद सांगोला शहराध्यक्ष भैरवनाथ बुरांडे,महेश बनकर, नाथपंथी समाज अध्यक्ष शिवाजी इंगोले, शिवसेना नेते समाधान कोळेकर,यांचेसह अनेक समाज बांधव बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker