
सांगोला : सांगोला तालुक्यातील महूद येथे राहत्या घरात झालेल्या स्फोटात एक जण जागीच ठार तर एक जण नंबर जखमी झाला असून सदरची घटना शुक्रवारी पहाटे घडलेली आहे. महुद येथील आटपाडी रोड लगत असलेल्या राहत्या घरात झालेल्या स्फोटात एक मृत्यू झालेला आहे, मृत झालेल्याचे नाव अतुल बाड असे असून त्याच्या नातेवाईकांनी यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला असून सखोल चौकशी करून पोलिसांनी संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे. सदरील स्फोट हा नेमका कशाने झाला? याबाबतचा तपास पोलीस करीत असून गॅसचा स्फोट झाला की? कशाचा, नेमके काय झाले? हे पोलिसांच्या तपासानंतरच समजणार आहे.