गुन्हेगारी

चोरीची मोटरसायकल व तीन मोबाईल बाळगणारा इसमावर पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर पोलीसांची कार्यवाही

मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

दि.१५/०७/२०२४ रोजी दुपारी १४.०० वा सुमारास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत पोउपनि संतोष निंभोरकर, व गुन्हे शोध पथकातील अंमलदार मोहरम निमित्ताने पेट्रोलिंग करीत असतांना गांधी चौक ते जटपुरा रोडवरील आंबेडकर चौक परीसरात संशयित एक इसम पत्नी, लहान बाळासह संशयितरित्या फिरत असतांना दिसुन आले.

त्यानी तेथे फिरण्याचे कारण विचारले असता त्यांचेजवळील मोबाईल विक्री करण्यासाठी फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना त्याचे नावे विचारले असता १) करण नाना जाधव, वय २९ वर्षे, रा.बोरव्हा, पोस्ट-खंडाळा, ता. तेल्हारा, जि. अकोला २) सौ. पुजा करण जाधव, असे सांगितले. त्याचे ताब्यातील होंडा फॅशन प्लस मोटरसायकल क्रमांक. एमएच-२७ एन-८४२३ बाबत विचारपुस केली काही एक समाधानकारक उत्तर दिले नाही.

नमुद इसम करण नाना जाधव, वय २९ वर्षे, रा.बोरव्हा, पोस्ट-खांडाळा, ता. तेल्हारा, जि. अकोला याचे ताब्यात तिन मोबाईल अंदाजी किंमत २७,०००/- रू व मोटरसायकल एमएच-२७ एन-८४२३ (मोहम्मद युनिस अब्दुल गणी रा. पिंपळखुटा, ता. मोर्शी. जि. अमरावती यांचे नावे असलेली) अंदाजी किंमत. २५,०००/- रू पंचासमक्ष जप्त करण्यात आले असुन सदरचे तिन्ही मोबाईल व मोटरसायकल नमुद इसमाने चोरी केले अथवा लबाडीने मिळविले असल्याचा दाट संशय आहे तसेच नमुद मोबाईल व मोटरसायकलचे मालकी हक्काबाबत तसेच ताब्यात बाळगण्याचे कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अदखलपात्र गु.र.नं ७६४/२०२४ कलम १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनयम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे सुचनेप्रमाणे मंगेश भोगांडे स.पो. नि. , संतोष निंभोरकर पोउपनि, सफौ/विलास निकोडे, पोहवा/महेद्र बेसरकर, पोहवा/सचिन बोरकर, पोहवा/निलेश मुडे, मपोहवा/भावाना रामटेके, पोहवा/संतोष पंडीत, पोशि/इम्रान खान, पोशि/संतोष कावळे, पोशि/दिलीप कुसराम, पोशि/शाहबाज, पोशि/रूपेश रणदिवे, पोशि/रूपेश पराते, पोशि/इरशाद, पोशि/मंगेश मालेकर, गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker