वॉरंटशिवाय पोलिसांचा तरुणावर अमानुष अत्याचार -पोलिस अधिकारी नरोटे आणि पथकावर कारवाई करा !
मुख्य संपादक-हिमायूं अली, मोबाइल नंबर -8975250567

पत्रकार परिषदेत पिडीत तरुणाच्या आईची मागणी
चंद्रपूर.पिडीत युवक आनंद गेडाम ची आई अनिता गेडाम यांनी पत्रकार परिषदेत घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करणा_या आणि तिच्या मुलाला जबरदस्तीने घेऊन जाणा_या आणि अमानुष अत्याचार करणा_या पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पथकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तिने सांगितले की, ती मित्रनगर येथील डॉ. आंबेडकर कॉलेजच्या मागे राहते. 24 तारखेच्या रात्री १ वाजता पोलिस अधिकारी देवराव नरोटे आणि त्यांच्या पथक समेत चार महिला पोलिस होते. त्यांनी कोणतीही सूचना आणि वॉरंटशिवाय घराचे गेट तोडले आणि दगडफेक करून बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. यादरम्यान त्यांनी घरातील लोकांना शिवीगाळ केली आणि धमकी दिली. आनंदचा फोटो घ्यायचा आहे असे सांगून मनमानी पध्दतीने वागण्यास सुरुवात केली.
पोलिस कर्मचा_यांचे असे वर्तन पाहून तिचा मुलगा आनंद गेडाम घरातून पळून गेला. लवकरच पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पथकाने त्याला पकडले, रागंबर आणि ठाकूरच्या घरी नेले आणि तेथे अमानुष मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला गल्लीत फेकून देण्यात आले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला सरकारी रुग्णालयात पाठवले आणि पोलिस तेथून निघून गेले असा आरोप पिडीत युवकाची आई अनिता गेडाम यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांवर केला.
तिने पुढे सांगितले की, दुस_या दिवशी फोन येताच कुटुंब त्याला सरकारी रुग्णालयात भेटण्यासाठी गेले. पिडीत आनंदची प्रकृती खूपच गंभीर होती. सीटी स्कॅन आणि इतर चाचण्यांनंतर डॉक्टरांनी त्याला तात्काळ नागपूर मेडिकलमध्ये रेफर केले. सध्या आनंद खाजगी पोद्दार रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. आनंद गेडाम यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती अनिता गेडाम यांनी दिली.
पीडित अनिता गेडाम यांनी पोलीस अधिकारी देवराव नरोटे आणि त्यांच्या टीमवर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर मानवाधिकार उल्लंघनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातुन केली आहे.
api देवराव नरोटे यांनी सर्व आरोप फेटाळले
या विषयावर एपीआय देवराव नरोटे यांच्याशी बोलले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, जिल्हा अधिकाऱ्यांनी एम.पी.डी.ए. कायदा १९८१ अंतर्गत आनंद गेडाम यांच्यावर कारवाई केली आहे. आनंद गेडाम यांच्यावर आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आनंद गेडाम यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी आदेश त्यांना देण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी ते त्यांच्या पथकासह आनंद गेडाम यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी त्यांना घराबाहेर बोलावले पण ते आले नाहीत. त्यांची बहीण आणि आई आली ज्यांनी एपीआय देवराव नरोटे यांच्याशी शाब्दिक वाद घातला आणि आनंद गेडाम यांना पळून जाण्यासाठी त्यात गुंतवून ठेवले. आनंद गेडाम यांनी घराच्या छतावरील दोरी काढून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ते वरून पडले आणि जखमी झाले, त्यानंतर एपीआय देवराव नरोटे ने रुग्णवाहिका बोलावून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. आनंद गेडाम यांच्यावर पोद्दार रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत.